शेगावातून एक आनंदाची बातमी येत आहे. गजानन महाराजांच्या भक्तांसाठी शेगावातील मनोहारी उद्यान आणि ध्यान केंद्र आनंद सागर हे लवकरच उघडले जाणार. आनंद सागर येत्या 2-3 महिन्यात भाविकांसाठी खुलं होणार अशी माहिती मिळत आहे. आनंद सागर हे संत गजानन महाराज संस्थानतर्फे सरकार कडून जमीन घेऊन पर्यटन केंद्र आणि ध्यान केंद्र म्हणून 200 एकरच्या परिसरात 2001 साली बांधण्यात आले होते. इथे मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.या पर्यटन केंद्राच्या भेटीसाठी लाखो भाविक देशाच्या काना कोपऱ्यातून येतात. मध्य काळात काही कारणास्तव शेगाव संस्थानाने आनंद गर बंद केले होते. ते आता येत्या 2-3 महिन्यात पुन्हा भाविकांसाठी सुरु होणार आहे.