एका बाजूला दूध संघाच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. गोकूळने खरेदी दरासह दूध विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता राज्यात एक लीटर दूधामागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कोल्हापुरचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही 11 जुलैपासून करण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमूलनेही दूध दरात वाढ केली होती.