मुंबईतील अंबरनाथमध्ये टोमॅटोच्
दररोजच्या सवयीनं रामास्वामी यांनी मंगळवारी सकाळी साडे पाच वाजता इडली-सांबरसाठी लागणारी टोमॅटोची चटणी तयार करून एका टोपात भरून ठेवली होती. आईजवळ झोपलेल्या तनुष्काचे डोळे उघडल्यानंतर खेळता खेळता ती गरम चटणीच्या टोपापाशी जाऊन पोहचली... आणि तोल जाऊन ती गरम चटणीच्या टोपात पडली. या घटनेत तनुष्का ८० टक्के भाजली. अत्यंत गंभीर अवस्थेत तनुष्काला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारा दरम्यान तनुष्काचा मृत्यू झाला.