मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अल्पवयीन मुलीसोबत एप्रिल महिन्यात घडली होती, परंतु आता हे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडितेने सांगितले की, घरी झोपलेली असताना तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. असे सांगितले जात आहे की, पीडितेने भीतीमुळे कोणालाही काहीही सांगितले नाही, परंतु आता तिने धाडस दाखवत आरोपी वडिलांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले, जिथून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी भंडारा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.