राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार आव्हाड यांनी धमकी देणाऱ्या 'X' व्यक्तीबद्दल माहिती दिली, ज्यामध्ये त्याचे दोन्ही मोबाईल नंबर देखील समाविष्ट होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीही धमक्या आल्या आहे. बिश्नोई टोळीच्या नावाने २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता, आव्हाड यांनी म्हटले आहे की सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीने त्यांना पुन्हा धमकी दिली आहे. या प्रकरणात पोलिस काय कारवाई करणार आणि त्या व्यक्तीने धमकी का दिली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.