मिळालेल्या माहितीनुसार, आर. टी. देशमुख हे राष्ट्रीय महामार्ग 361 वरून तुळजापूर, औसा, लातूर मार्गे कारने बीडला जात होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी रस्त्यावर घसरली. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असताना कार पाच ते सहा वेळा उलटली. यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला
जवळच्या चौकीवरील चार पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कार चालक आणि देशमुख यांना गंभीर नुकसान झालेल्या वाहनातून बाहेर काढले," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, देशमुख यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर दुखापतींमुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला. कार चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. देशमुख २०१४ ते 2019 पर्यंत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून भाजपचे आमदार होते