राज्यात पावसाने जोर पकडला आहे. मुंबई आणि भोवतील परिसरात पावसामुळे लोक हैराण होत आहे. अशात कोल्हापूर तसेच कोकणातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई, कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या विविध भागांत नद्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या मुंबईत पाच, सातारा, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई, कोकण आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पावासाने आतापर्यंत दोन लोकांचा बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून मुंबईत मस्जिद बंदर येथे विजेच्या धक्क्याने रेल्वेचा एक कर्मचारी ठार झाला.