जबलपूरहून हैद्राबाद जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी, नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

रविवार, 1 सप्टेंबर 2024 (15:30 IST)
जबलपूरहून हैद्राबाद कडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाली असून हे विमान नागपुरात वळवले. विमानातून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले असून नागपुरात शोध मोहीम सुरु झाली.  

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरहून हैदराबादला जाणारे फ्लाईट 6E7308 मध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर रविवारी विमान नागपुरात वळवून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानतळावर अरब प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले असून बॉम्बशोध पथकाने तपासणी सुरु केली.

विमानाच्या टॉयलेट मध्ये विमानात बॉम्ब असण्याचा मेसेज मिळाला.टॉयलेट रोलच्या तुकड्यावर निळ्या शाईने लिहिलेला संदेश दिसला. त्यावर लिहिले होते - 'Blast@9' विमानाच्या क्रू सदस्याने हे पाहिल्यावर वैमानिकाला सूचना दिली आणि विमानाची तातडीने नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या विमानात 69 जण प्रवास करत होते. नागपूर विमानतळावर सर्व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती