जात पडताळणीसाठी मुदत वाढ

बुधवार, 20 जून 2018 (17:16 IST)
राज्य सरकारने जात पडताळणी संदर्भात विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. जात पडताळणीसाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० जूनपर्यंत जात पडताळणीसाठी मुदत होती मात्र आता ती वाढवून १० ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता १० ऑगस्टपर्यंत जात पडताळणीचे दाखले विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. याचा फायदा  अभियांत्रिकी, मेडिकल, आर्किटेक्चर, बी फार्म या विद्यार्थ्यांना होणार आहे. 
 
मंत्रीमंडळने समाजकल्याण विभागाच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी जातपडताळणीसाठी अर्ज केले नाही त्यांनी येत्या दोन दिवसात अर्ज करावे लागणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती