बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालकाला अटक

बुधवार, 20 जून 2018 (17:11 IST)
बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह ६ जणांना बुधवारी अटक केली आहे़.
 
बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) तसेच चार्टर्ड अकाउंटंट सुनील घाटपांडे, डीएसके ग्रुपचे इंजिनिअरींग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांचा अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
डी़. एस़. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रीम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवात केली होती़ बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़ गैरवापर व गैरव्यवहार करून कंपनीला कर्ज मंजूर केले, असा ठपका ठेवून त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती