मिरजेत कृष्णा नदीत पाच मजूर बुडाले; तिघे बचावण्यात यश; दोघांचा मृत्यू

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (07:48 IST)
कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाल्याची घटना मिरजेतील कृष्णा घाट येथे घडलीय. यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून दोघांचा मृत्यू झालाय.
 
मिरज-मालगाव रस्त्यावरील दत्तनगर येथे भाड्याने वास्तव्यास असलेले राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते. कपडे धूत असताना यापैकी पाच जण पाण्यात बुडाले. बुडालेल्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले. मात्र, रामस्वरूप यादव आणि जितेंद्र यादव या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अग्निशमन विभाग आणि आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती