नागपूरमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग

मंगळवार, 16 जून 2020 (09:52 IST)
नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
 
आज पहाटे नागपूर शहरातील इतवारी येथील चुना ओळी परिसरात असलेल्या एका प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली आहे.  काही वेळात आगीने रौद्ररुपधारण केले आहे.  इतवारी परिसरात दूरवर आगीमुळे धुराचे दूरपर्यंत लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.
 
आगीची माहिती मिळताच पालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत अग्निशामन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.  या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून गोदामाच्या आजूबाजूचा परिसर हा खाली करण्यात आला आहे.
 
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती