महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात मृतावस्थेत बिबट मादी आढळली

शनिवार, 1 जानेवारी 2022 (15:13 IST)
राहुरी कृषी विद्यापीठाच्या शेती गटनंबर २१७ मध्ये २ वर्षाची बिबटमादी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
 
या बिबट मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा सवाल गुलदस्त्यात राहिला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुुरवारी बिबटमादी मृत अवस्थेत आढळून आली.
 
या घटनेबाबत कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी राहुरी वनविभागाला खबर दिल्याने वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन निकम,वनविभागाचे गोरख मोरे,
सतीश जाधव, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन कृषी विद्यापीठ सुरक्षा रक्षकाच्या मदतीने बिबटमादीचा मृतदेह डिग्रस नर्सरीत हलवण्यास आला.डिग्रस नर्सरीत शव विच्छेदनानंतर बिबट मादीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.बिबट मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ?
 
हे पशू वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तीन वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला होता.

photo: symbolic

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती