पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि मुलाचे दररोज वाद होत होते. मुलगा वडिलांना शिवीगाळ करायचा. मुलगा बुधवारी सकाळी सुरेश गाढ झोपेत होता. त्यानंतर वडिलांनी घरातील कुऱ्हाडीने मुलावर हल्ला केला. दोन ते तीन वेळा मार लागल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती वरुड पोलिसांना देण्यात आली. वरुड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले.तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.