पावसानंतर चोरीमुळे शेतकरी त्रस्त ! रात्री चोरांनी 100 क्विंटल पेक्षा जास्त कांदा गायब केला

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (13:23 IST)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. यापूर्वी मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. त्याचबरोबर आता चोरट्यांनी धुळे जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या मेहनतीत  बिघाड केल्याचे वृत्त मिळाले आहे.हे  प्रकरण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे आहे, जेथे शेतकरी सुभाष रामराव शिंदे यांनी जमा केलेले 100 क्विंटल कांदे मध्यरात्री चोरीला गेले. यामुळे शेतकऱ्याचे साडे तीन  लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
 
शेतकऱ्याने पाच महिन्यांसाठी 150 क्विंटल कांदा जमा केला होता
धुळे कुसुंबा परिसरातील रहिवासी सुभाष शिंदे यांनी गेल्या पाच महिन्यांपासून 150 क्विंटल कांदा जमा केला होता. गेल्या महिन्यापासून बाजारात कांद्याचे चांगले भाव मिळतात पाहून त्यांनी गेल्या आठवड्यात पंधरा क्विंटल कांदा विकला होता.यानंतर शेतकरी सुभाष यांच्या कडे 134  क्विंटल कांदा शिलक्क होता. त्यापैकी 100 क्विंटल कांदा चोरीला गेला आहे.

त्याच भागातील राहणारे दुसरे शेतकरी बंधू प्रफुल्ल शिंदे सकाळी शेतात गेले  असता त्यांना साठवलेला कांदा विखुरलेला दिसला.त्यानंतर त्यांनी लगेच सुभाष शिंदे यांना फोनवरून कांद्याच्या चोरीची माहिती दिली. विखुरलेले कांदे पाहून सुभाष हे खूप निराश झाले होते. झोपडीतून सुमारे शंभर क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आजच्या बाजारभावाप्रमाणे साडेतीन लाख रुपयांपर्यंत कांदा चोरीला गेला आहे. शेतकरीने लगेच धुळे तालुका पोलीस ठाण्यात जाऊन  तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुभाष शिंदे शेतकऱ्याने सांगितले की, परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब झाल्यामुळे प्रत्येकाचा कांदा खराब झाला आहे. मी चार हजार रुपयांचे उत्तम प्रतीचे कांद्याचे बियाणे पासून कांद्याची लागवण केली होती.म्हणून गेल्या सहा महिने साठवलेल्या कांद्यांची परिस्थिती चांगली होती. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात घसरण झाली होती.त्यामुळे कांदा विकला जात नव्हता. पण आता कांद्याच्या किमतीत झालेली चांगली वाढ लक्षात घेता मी आता सहा महिन्या पासून साठवलेले कांदे विक्रीसाठी काढत आहे. पण कांद्याची चोरी झाल्यामुळे मला तब्बल साढे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने सर्व काही साठवले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती