"बिग बॉसमध्ये माझ्या जाण्याच्या निर्णयाने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते अशा शब्दांमध्ये शिवलीला पाटील यांनी माफी मागितली आहे,बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या त्या पहिल्या सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्या उपचारासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
"आपण कीर्तनकार आहोत, अध्यात्मात वाढलेली माणसं आहोत. हजार लोक आपल्यासमोर बसून ऐकतात, त्यांच्यासमोर सिद्ध करताना किती गोष्टींना जावं लागतं, असं त्यांना वाटत होतं. पण मी एक वाक्य मनात ठेवलं की किस्मत भी हिम्मतवालों का साथ देती आहे आणि मी धाडस केलं," असं शिवलीला यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.