डॉ. अमोल कोल्हेच्या नेतृत्वाखाली जुन्नर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा

बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:11 IST)
महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणा-या शेतकरी आक्रोश मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून दि. 27 जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे.
 
खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतक-यांना अनुदान, दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित शैक्षणिक कर्ज धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून 27 ते30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे,

Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती