हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. शरद पवार गटाने आमदार अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर सादर केले आहे. मात्र अजित पवार गटाने विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी नोटीशीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याची वेळ मागून घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तर शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस पाठवण्यात आली. याशिवाय अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल केलेल्या याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश होता.