महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, राज्य सरकारने सुरू केली योजना

बुधवार, 31 जुलै 2024 (11:09 IST)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, याकरिता राज्य सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' सुरू केली आहे. तसेच योजने अंतर्गत, एप्रिल 2024 पासून, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे.
 
महाराष्ट्र सरकार ने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना सुरु केली आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज संबंधित समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य सरकार ने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024'' ची सुरवात केली आहे. या योजने अंतर्गत एप्रिल 2024 पासून 7.5 हॉर्सपावर पर्यंत क्षमता असणारे कृषि पंपाचा उपयोग करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतरकऱ्यांसाठी ही योजना  मार्च 2029 पर्यंत प्रभावी असणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप लाभ मिळणार आहे. 
 
महाराष्ट्रातील शेतकऱयांना सिंचनाकरिता मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याला पाहता  'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' ची सुरवात करण्यात आली आहे. येत्या काळात या योजनेत कोणते बदल झाले आणि त्याचा काय परिणाम झाला याचा आढावा घेण्यासाठी तीन वर्षांनंतर बैठक घेतली जाणार आहे. योजना चालवण्यासाठी राज्य सरकार ने पर्याप्त बजेट वाटप केले आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी  6985 करोड रुपये वाटप केले आले आहे. याशिवाय वीज दरामध्ये सूटसाठी अतिरिक्त 7775 करोड रुपये देण्यात आले आहे. अशा प्रकारे, राज्यभरातील शेतकऱ्यांना एकूण 14,760 कोटी रुपयांची वीज दरात सूट दिली जाणार आहे.

*योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील फक्त शेतकरीच घेतील.
7.5 HP पर्यंतचे पंप असलेले शेतकरीच या मोफत योजनेचा लाभ घेऊ शकतील.
जर पंप 7.5 HP पेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला वीज बिल भरावे लागेल.

*कागदपत्रे-
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
किसान कार्ड
वीज बिल
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती