अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत. अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील. पण, भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.