पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:23 IST)
महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्टला झाली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपच्या वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे.
 
ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर पीक पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत करु शकतात. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली आहे.
 
नाशिकच्या निफाड तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. तर, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ई-पीक नोंदनीचे प्रशिक्षण देत आहेत. येत्या सात दिवसाच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला मुकावे लागणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणी अ‌ॅपचा वापर करुन नोंदणी करावी, असं आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती