याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात ही संतापजनक घटना घडली आहे. लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहे.
आरोग्य केंद्रात 6 जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी एका बाळाला आणण्यात आले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी या बाळाला तपासले आणि त्याला औषधे दिली. यात एक कफ सिरपची बॉटल देखील होती. कफ सिरप देताना सिरप झाकनात ओतून घेतले असता त्यात अळी असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कुटुंबियांनी हे संपूर्ण औषध खाली ओतून पाहिलं.
आतापर्यंत जेवणात, स्ट्रीट फूडमध्ये किंवा चॉकलेट आणि बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता थेट औषधामध्ये औषधामध्ये अळ्या निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापजनक वातावरण पसरलं आहे.