करुणा धनंजय मुंडे यांचे पुस्तक पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वीच आता त्या पुस्तकावरून वाद

शनिवार, 15 मे 2021 (15:24 IST)
करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्ट करत त्यांच्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम कथेचं पुस्तक लवकरच प्रकाशित करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याची झलक त्यांनी फेसबूक पोस्टमधून दाखवली आहे. त्या पुस्तकामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वीच आता त्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे.
 
करूणा धनंजय मुंडे नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आधारित एक पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता या फेसबूक पोस्टमध्ये वापरलेल्या एका पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आता थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
 
या पुस्तकाच्या कव्हर पेजवर ‘होली बायबल’ असं लिहिलेलं आहे. तर त्याच्या खाली मोठ्या अक्षरात प्रेम शब्द लिहिला आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी होली बायबल शब्दावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं गेलं आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

दरम्यान, करूणा शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्या मुलांना 3 महिन्यांपासून डांबून ठेवलं आहे, असा आरोप केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती