लहान मुलांना तातडीने मदत केली जावी म्हणून हेल्पलाईन नंबर जारी

शनिवार, 15 मे 2021 (08:39 IST)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना तातडीने मदत केली जावी म्हणून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. ज्या बालकांना कोरोना झाला आहे आणि ज्यांना कुणीच नाही किंवा ज्या बालकांचे आई-वडील कोरोनाने दगावले आहेत, अशा बालकांच्या संगोपनासाठी आणि उपचारासाठी या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 
 
कोरोना झालेल्या ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही किंवा ज्या बालकांचे पालक कोरोनामुळे दगावले आहेत अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती, जालना व चाईल्ड लाईन टोल फ्री क्र. 1098 तसेच खालील संपर्क क्रमांकावर देण्यात यावी. जेणेकरुण सदर बालकांना आवश्यक मदत वेळेत पुरवता येईल, असे आवाहन जालन्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
 
हेल्पलाईन क्रमांक
 
>> बाल कल्याण समिती टोल फ्री क्रमांक-1098, संपर्क क्रमांक- 9890841439
>> शासकीय मुलांचे बालगृह, शंकरनगर संपर्क क्रमांक- 9404000405
>> जिल्हा बाल संरक्षण कक्ष संपर्क क्रमांक – 7972887043, 8830507008
>> महिला व बालविकास विभाग, मदत कक्ष संपर्क क्रमांक- 8308992222, 7400015518
>> जिल्हा महिला व बालविकास विभाग संपर्क क्रंमाक- 02482-224711

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती