गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार

सोमवार, 13 मे 2024 (21:30 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी एक पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
 
महाराष्ट्रातील गडचिरोली हे नक्षलग्रस्त भागांपैकी एक भाग असून लोकसभाच्या पहिल्या टप्यात येथे मतदान झाले.चकमक थांबल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन एक A K 47 रायफल, एक कार्बाईन गन, आणि एक इन्सास रायफल जप्त केली. या चकमकीनंतर पोलिसांनी शस्त्रास्त्रांशिवाय नक्षलवाद्यांच्या इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. गेल्या एका महिन्यात सुरक्षा दलांनी 100 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जंगलाच्या काही भागात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शोध मोहिमेसाठी जवानांचे पथक तिथे पोहोचले. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला त्यात तीन नक्षलवादी ठार झाले. 
 
Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती