डॉ. पाध्ये यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश युवा वर्गात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. या स्पर्धेच्या निमीत्ताने अनेक उत्तम वक्तृत्व असणाऱ्या व समाजापुढील प्रश्नांवर विचारमंथन करण्यास इच्छूक असणाऱ्या युवक युवतींना आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध होईल. आजची पिढी, तंत्रस्नेही पिढी, मुलींचे विवाहाचे वय २१ करण्याचा निर्णय, सृजनकर्ती मी, असुरक्षित मी, भारतीय स्त्री - आत्मनिर्भर स्त्री, मुलगी देशाची शान, प्रत्येक घराचा सन्मान असे वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धा १६ ते २५ ह्या वयोगटातील मुला - मुलींसाठी आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग ५० ते ६० एमबी या पेक्षा अधिक आकाराचे नसावे. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ११ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी ७ हजार त्याखेरीज उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपले व्हिडीओ
[email protected] या ई-मेल वर पाठवावेत.