Konkan Railway कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण; पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण

सोमवार, 20 जून 2022 (11:35 IST)
भारतीय रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता अजूनच सुसाट होणार आहे कारण कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
 
मागील 7 वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होते. आता या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास प्रदूषणमुक्त होणार आहे.
 
रेल्वे मंत्रालयाने 2016 मध्ये कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचा लोकापर्ण सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान ऑनलाइन हजेरी लावणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती