विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, 26 जूनला मतदान

शनिवार, 25 मे 2024 (10:01 IST)
विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या असून येत्या 26 जून रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. 
 
लोकसभा निवडणुकांचा निकाल येत्या 4 जून रोजी जाहीर आहे. त्यानंतर विधानपरिषेदच्या निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा नव्याने करत आली आहे. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. 
 
मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.मतदान 26 जून रोजी मतदान होणार असून मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती