एकनाथ शिंदे 5 डिसेंबरला घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (21:15 IST)
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाराजीचे वृत्त असतानाच देवेंद्र फडणवीस स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. नाराजीच्या वृत्तानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीनंतर शिंदे यांनी गृहमंत्रालयाचा आग्रह सोडल्याची माहिती समोर आली आहे. 5 डिसेंबरला ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
 
अलीकडेच कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज ना उद्या घोषणा होऊ शकते आणि त्याआधी काहीही होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजच महायुतीची महत्त्वाची बैठक होणार होती, त्याआधीच शिंदे यांची प्रकृती खालावली. 
 
डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांच्या काही चाचण्या करण्यास सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. डॉक्टरांची टीम काही चाचण्या करून अहवाल देईल. शिंदे यांना सतत ताप आणि घशाचा संसर्ग होत आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती