Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

शनिवार, 22 जुलै 2023 (13:41 IST)
Eknath Shinde Delhi Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री काल दिल्लीला गेले. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दिल्ल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. 

सध्या महाराष्ट्र राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन झाल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होत आहे. राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ होत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना केबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होतो, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काय निर्णय घेतला जातो हे येत्या काळात समजेल. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 18 जुलै रोजी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते.नंतर अमित शहा यांच्या सोबत एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली.काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असून आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती