ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं आहे : भुजबळ

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:53 IST)
'अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,' असं राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  म्हणाले.
 
केंद्र सरकार किंवा भाजपच्या कारवाईविरोधात बोलणं म्हणजे कारवाई ओढवून घेणं अशी सध्याची परिस्थिती असल्याचं भुजबळांनी म्हटलं. 'विरोधी सूर उमटला की लगेच कारवाई होते. राज्यात आम्ही सत्ता स्थापन केली, तेव्हाच अशा प्रकारच्या अडचणी येणार याची कल्पना होती,' असं ते पुढे म्हणाले. 'ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं आहे. केंद्राकडून केवळ आणि केवळ सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती