राज्यात कोरोना मृतांच्या सर्वाधिक निच्चांकी आकड्याची नोंद

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (09:36 IST)
कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा कोरोना फोफावला. 
 
राज्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना मृतांच्या सर्वाधिक निच्चांकी आकड्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात असतानाच हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी महाराष्ट्रात एकूण 4,153 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 3,729 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 
 
30 रुग्णांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला. ही एकंदर आकडेवारी पाहता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 17,84,361वर गेल्याचं लक्षात आलं. आचापर्यंत कोरोनामुळं मृत झालेल्यांची एकूण संख्या 46,653 इतकी झाली आहे. 
 
आतापर्यंत यापैकी 16,54,793 रुग्ण बरे झाले असून, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 81,902 जणांवर सध्या कोरोनावरील उपचार सुरु आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती