23 नोव्हेंबर रोजी राज्यातील पालघर आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक ला रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली .नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 04.04 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तर पालघर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले रिश्टर स्केलवर तीव्रता 3.4 इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची पुष्टी केलेली नाही.