Dombivli : शिक्षिकेने केली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, कारवाई करण्याची पालकांची मागणी

शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (16:25 IST)
Dombivali: शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतो. पालकांनंतर मुलं जायचे जास्त ऐकतात काही शिकतात ते गुरु म्हणजे शिक्षक असतात. आपल्या पाल्याला मोठ्या विश्वासाने पालक शाळेत शिक्षकाच्या स्वाधीन करतात जेणे करून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांची प्रगती व्हावी. शिक्षक देखील मुलांना चांगले घडवण्यासाठी काहीवेळा शिक्षा देतात.

मात्र जर शिक्षक आपली मर्यादा विसरून मुलांना शिक्षा देत असेल तर त्याला काय म्हणावं. डोंबिवलीतील शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून 50 ते 60 मुलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक चांगलेच संतापले असून त्या शिक्षिके बाबत कारवाई करण्याची मागणी शाळा प्रशासनाला केली आहे. 
 
 डोंबिवलीतील एचएस जोंधळे विद्या मंदिर शाळेत गणित शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने इयत्ता पाचवी ,सहावीच्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही म्हणून रागाच्या भरात येत लोखण्डी रॉड ने मुलांना बेदम मारहाण केली.या मुळे अनेक मुलं गंभीर जखमी झाली. 

सर्व प्रकार मुलांच्या घरी समजल्यावर संतप्त पालकांनी मनसे विद्यार्थी सेनेला ही माहिती दिली. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी आणि शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला. आणि मुख्याध्यापकांना शिक्षिकेच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पालकांनी गदारोळ केला. पोलिसांनी घटनास्थळी पोंहोंचून परिस्थिती नियंत्रणात आणली.     

या प्रकरणावर शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, हा सर्व प्रकार शाळेत प्रथमच घडत असून ती शिक्षिका नवीन नियुक्त झाली असून तिची शिकवण चांगली असल्यामुळे तिला या नौकरीवर रुजू केलं आहे. मात्र त्यांची शिक्षा देण्याची पद्धत चुकीची असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.तसेच पुन्हा भविष्यात अशी चूक होणार नाही यासाठी काळजी घेऊ.
 




Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती