ब्रिटिशांनी बांधलेल्या विहिरीत किशोर पडला
बिलाल विहिरीत पडल्याचे पाहून दोन्ही मित्र मदतीसाठी सुरक्षा रक्षकाकडे गेले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर गार्डने विष्णूनगर पोलिस ठाण्यात माहिती दिली आणि तातडीने शोध सुरू करण्यात आला.
रील शूट करताना तो चुकून विहिरीत पडला होता, असा दावा त्याच्या मित्रांनी केला होता, परंतु मृत्यू कशामुळे घडला हे समजून घेण्यासाठी आम्ही चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
32 तासांनंतर मृतदेह सापडला
डोंबिवली अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या टीमने दिवसभर शोध घेतला आणि घटनेच्या 32 तासांनंतर सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडला.