युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा घेऊ नये

गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (16:50 IST)
पाकिस्तानवर एअर स्ट्राइकची कारवाई केल्यानंतर सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी ट्विटरवरून अशा मुद्द्यांचं राजकारण करू नये, असं आवाहन केलं आहे.
 
राज ठाकरे म्हणाले, युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील निष्ठुरपणे म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवाव असही राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती