Do not disturb the farmers राज्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे अनेक ठिकाणी शेतीपिकं पाण्याअभावी वाया गेली आहेत. ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसाने ओढ दिल्याने वाया गेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच महावितरणच्या ठिसाळ कारभाराचा फटकाही शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा सस्पेंड करेन. शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणू नका. तात्काळ त्यांना विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून द्या, अशा सूचनाही यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.