महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच निर्णयाची मागील अनेक वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला 45 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळीची रक्कम देण्यात येणार आहे.
एसटीच्या 89 हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही चन्ने यांनी सांगितले.