वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद, कोर्टाने दिली ही शिक्षा

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (14:45 IST)
नाशिक: वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला अरेरावी करत तुझी वरिष्ठांकडे तक्रार करेल अशी धमकी देणाऱ्या आरोपीला सोमवारी (दि. १५)न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ३००० रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली.
 
अभियोग कक्ष विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०१२ रोजी १२ वाजता सीबीएस सिग्नल येथे वाहतूकच्या कर्मचारी वैशाली वानखेडे या रहदारी नियंत्रण कर्तव्यावर असताना आरोपी दुचाकी चालक गुलाम मुसा शेख रा. टाकळीरोड हा दुचाकी एमएच १५ बीएच २८१५ शालिमारकडे वेगाने जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
 
आरोपीने अरेरावी करत मी तुमची वरिष्ठांकडे तक्रार करतो अशी धमकी दिली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन हवालदार एस. एम. सोनवणे यांनी सबळ पुरावे गोळा करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकारी यांच्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा आणि ३००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाकडून आर. वाय.सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती