'या' विषयाला फार महत्त्व देऊ नये दिलीप वळसे पाटील यांचे ट्विट करून आवाहन

बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (08:04 IST)
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वाद चिघळत जात आहे.  याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून या विषयाला फार महत्त्व देऊ नये असे आवाहन लोकांना केले आहे.
 
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.
 
दरम्यान याप्रकरणाबाबत सोलापूर पोलिसांनी ट्विट करून सावधानतेचा इशारा दिला आहे. सोलापूर पोलीस म्हणाले की, ‘कर्नाटक राज्यातील हिजाब विवाद प्रकरणी अफवा पसरवू नका. अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका. अफवा ठरू शकतात जीवघेण्या.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती