करूणा मुंडे यांची मागणी म्हणाल्या शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याला अटक करा

बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (08:00 IST)
अत्याचारा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याला अटक करण्याची मागणी करूणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पीडितेची भेट घेतली.
 
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करून पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे.
 
या वेळी मुंडे म्हणाल्या की, अह्मदनगर  तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने महिलेवर अत्याचार करूनही त्याला अद्याप अटक झालेली नाही.आरोपीला अटक व्हावी यासाठी पीडितेला उपोषण करावे लागते ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे.
शिवशक्ती सेनेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलन छेडले जाणार आहे. शक्ती कायदा महाराष्ट्रात आणला मात्र त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
महिला आयोगाने अशा पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घ्यावी, अन्यथा महिला आयोग बरखास्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती