नाशिकच्या चोरट्यांची जळगावात धूम, ८ सोनसाखळ्या लंपास

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:24 IST)
नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दोन सोनसाखळी चोरांच्या मुसक्या जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने आवळल्याची माहिती दिली. या चोरट्यांनी तब्बल तब्बल आठ महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या होत्या ते म्हणाले की, जिल्हापेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका महिलेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली होती.
 
या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलिसांनी केला असता त्यांना नाशिकमधील दोन चोरट्यांनी हे कृत्य केल्याची माहिती मिळाली. याअनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने याची कसून चौकशी करून संदीप सोनवणे आणि सतीश चौधरी या दोघा चोरट्यांना शिताफीने अटक केली.
 
या दोन्ही चोरट्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी जळगावात यात स्वरूपाच्या तब्बल आठ सोनसाखळी लंपास केल्या असल्याची माहिती दिली.या अनुषंगाने या दोघांना अटक करून त्यांच्या कडून मुद्देमाल प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. ही कारवाई जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती