धनंजय मुंडेंनी २००६ सालापासून माझा फक्त वापर केला आहे. तसेच माझा प्रत्येक गोष्टीसाठी वापर करण्यात आला. असा आरोप रेणु शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्या पुढे म्हणाल्या की, माझा काही जणांनी वापर करून अन्याय केला तेच माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत.
धुरी हे मला स्वतः मेसेज आणि कॉल करायचे याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यासोबत राहत असल्याचे सांगितल्यावर धुरी यांनी मला मुंडेंवरून शिव्या घातल्या होत्या. ज्या मुंडेंना या धुरींनी शिव्या घातल्या होत्या तेच धुरी मुंडेंना समर्थन देण्यासाठी माझ्यावर तक्रार करत असल्याचाही आरोप रेणु शर्मा यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला. याचबरोबर रिझवान शेख मला लग्नासाठी पाठीमागे लागला होता. असे रेणु शर्मा यांनी सांगितले