राज्यात मंगळवार 11 फेब्रुवारी पासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या असून पहिल्याच दिवशी राज्यात नकलची अनेक प्रकरणे गोंदवली गेली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली. राज्यात परीक्षेची तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नकल रोखण्यासाठी व्यवस्था केली होती. तरीही राज्यातून नकलची प्रकरणे समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) मते, मंगळवारी महाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) इयत्ता 12वी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपीचे 42 प्रकरणे नोंदवली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, ज्या परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे वृत्त आहे, त्या परीक्षा केंद्रांवर कायमची बंदी घातली जाईल.
तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडीओ केमेऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे निर्देश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच शाळेतील कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नकल करवताना आढळ्यास त्यांना बडतर्फ करावे. असे निर्देश देखील देण्यात आले आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याची तक्रार आढळल्यास राज्यातील ज्या परीक्षा केंद्रांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्या केंद्रावर कायमची बंदी घातली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.