शेतकरी आत्महत्या थांबतील का कर्ज माफी दिली तर - मुख्यमंत्री

गुरूवार, 16 मार्च 2017 (14:38 IST)

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविरोधात राज्य सरकार नाही. विरोधकांना कर्जमाफी बँकेतील घोटाळे लपवण्यासाठी हवी आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार कर्जमाफी केल्यावर  का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत उत्तर दिलं आहे. मात्र विरोधक विरोध करत असून कोणताही निर्णय घेवू दिला जात नाही अशी स्थिती आह.दुष्काळानंतर भाजपने थेट 8 हजार कोटी रुपये दिले आहेत. पण विरोधकांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही.  राज्याची आणि शेतकऱ्यांची दुबळी झालेली आर्थिक स्थिती ह्या विरोधकांमुळेच झाल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आपल्या राज्याला कर्जमाफी शक्य नाही तर आर्थिक रित्या करता येणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा