प्रथमच सह पालकमंत्री निवड तर नवीन पालकमंत्री नियुक्त

शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (10:39 IST)
आठ जिल्ह्यांची रखडलेली  पालकमंत्रिपदं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जाहीर करण्यात आली आहे. तर प्रथमच पालकमंत्रिपदं जाहीर करताना पहिल्यांदाच सहपालकमंत्रिपद निर्माण करण्यात आलं आहे . तसंच घटकपक्षांचीही पालकमंत्रिपदी दिली आहेत.
 
जळगावात पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटलांकडे देण्यात आलं आहे . तर सांगलीचे पालकमंत्रिपद सुभाष देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल आहे . परभणीच्या पालकमंत्रिपदी सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीये. तर नांदेडचं पालकमंत्रिपद अर्जुन खोतकरांकडे देण्यात आलंय.
 
विशेष म्हणजे यावेळी सहपालकमंत्रिपदाची घोषणा करण्यात आलीये. पणन मंत्री सदाभाऊ खोत यांची साताऱ्याच्या सहपालकमंत्रिपदी निवड करण्यात आलीये. तर महादेव जानकर यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचं सहपालकमंत्रिपद देण्यात आल आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री यांनी घटक पक्ष आणि भाजपातील नाराजना खुश केले आहे. 
 
नवे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री
 
1.जळगाव- चंद्रकात दादा पाटील 
2. सातारा- सदाभाऊ खोत, सहपालकमंत्री 
3. वाशिम- पालकमंत्री संजय राठोड, मदन येरावार सह पालकमंत्री 
4. उस्मानाबाद- दिवाकर रावते, पालकमंत्री, महादेव जानकर सह पालकमंत्री 
5. यवतमाळ- मदन येरावार, पालकमंत्री , संजय राठोड सहपालक मंत्री 
6. सांगली- सुभाष देशमुख , पालकमंत्री
7. परभणी – गुलाबराव पाटील, पालकमंत्री 
8. नांदेड- अर्जुन खोतकर, पालकमंत्री 

वेबदुनिया वर वाचा