उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत जनतेला आवाहन केले, भरसभेत रोहित पवार यांना सुनावले

रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (15:34 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीत रघुनंदन पंतसंस्थेच्या इमारतीच्या उदघाटनाच्या वेळी  बोलताना म्हणाले, सध्या कोरोनाची लाट सरत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत देखील मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. अशा परिस्थितीत अधिकच काळजी घेण्याची गरज आहे. लसीकरण झाले असले तरीही बेफिकीरी बनून चालता येणार नाही. कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये या साठी आपल्याला कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे किंवा सेनेटाईझ करणे आवश्यक आहे. पण सध्याची स्थिती अशी दिसत आहे की अनेक जण आता बेफिकीरीपणा ने वागत आहे. तोंडाला मास्क नाही, सामाजिक अंतर राखत नाही. असं करून आपण स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहोत. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये या साठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. मी तर भाषण करताना देखील मास्क काढत नाही. त्यांनी भरसभेत पुतण्या रोहित पवारला सुनावले ते म्हणाले , हा रोहित मास्क वापरत नाही. हे चुकीचे आहे.सर्वांच्या असं वागण्याने तिसरी लाट आली तर ते धोकादायक असू शकतं. जर आमदार असून आपणच असे वागलो तर जनतेला काय सांगणार. रोहितच असं वागणं हे पूर्णपणे चुकीचे आहे. 
 
जनतेला आवाहन करताना ते म्हणाले की , कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला कोरोनाच्या नियमांचे पालन करावेच लागणार. त्या साठी मास्कचा नेहमी वापर करा. जरी लसीकरण झाले आहे तरी ही मास्क लावणे बंधनकारक आहे. कोरोनाचा वेग जरी मंदावला आहे तरी अद्याप कोरोना गेला नाही. अजून ही अधून मधून कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. तिसरी लाट येऊ नये या साठी आपणच खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या नांदेड, मालेगाव आणि अमरावती हिंसाचार वरून त्यांनी जनतेला सलोख्याने राहण्याचे आवाहन केले आहे. काही समाजकंटक गैर फायदा घेत राज्यात दंगल करत आहे. आपण सर्वानी सलोख्याने राहण्याचे प्रयत्न करावे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती