महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे प्रयत्न - नाना पटोले

रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:27 IST)
महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे.
 
म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपाचे षडयंत्र आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.
 
महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भाजप विरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून असे षडयंत्र केले जात आहे, असंही पटोले म्हणाले. 
दरम्यान, याच मुद्द्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एक प्रतिक्रिया दिली. राज्यातील हिंसाचारामागे एखादी मोठी शक्ती आहे, असं दानवे म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती