Dengue worms in the water चार हजार घरांतील पाण्यात डेंग्यूची अळी

गुरूवार, 27 जुलै 2023 (08:37 IST)
Dengue worms in the water  : डेंग्युचा प्रसार रोखण्याकरीता लातूर शहर महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे १२९ आरोग्य कर्मचा-यांनी आतापर्यंत शहरातील ७४ हजार १४१ घरांमध्ये जाऊन दोन लाख सात हजार २२९ ठिकाणचे पाणयाचे नमुने तपासले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत चार हजार १७५ घरांतील पाणी नमुन्यांत डेंग्युच्या एडिस एजिप्ती डासांची अळी पैदास झालेले आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
या दुषित पाण्यापैकी एक हजार २७४ स्त्रोतांतील पाणी काढून टाकण्यात आले आहे. तर उर्वरीत ३ हजार ७९५ ठिकाणच्या हौद, पाण्याची सिमेंटची टाकी, बसविलेले प्लास्टिक टँक, अशा स्त्रोतांमध्ये अ‍ॅबेटिंग करुन तेथील एडिस एजिप्ती अळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण असल्याने डासांच्या अळयाही मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहेत. यामुळे शहरात अ‍ॅबेटिंगची दुसरी फेरीही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. आता एडिस एजिप्ती अळ्या आढळलेल्या ठिकाणी दुस-या फेरीतही अळ्या आढळून आल्या तर त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत, असे लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगीतले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती