दिल्ली: एकतर्फी प्रेमातून तरुणाला जिवंत जाळले

शनिवार, 6 जानेवारी 2024 (15:09 IST)
एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याची बातमी अनेकदा ऐकतो. पण एकतर्फी प्रेमातून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार दिल्लीतील वजिराबाद येथे झाला आहे. या प्रकरणात एका तरुणीने तरुणाला घरी बोलावून त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे. हा तरुण स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत होता. तो पेटलेल्या अवस्थेत इकडे तिकडे पळत होता. त्याला रुग्णालयात नेले असता शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण आणि आरोपी तरुणी भाऊ बहीण होते. तरुण मावशीचा मुलगा आणि तरुणी ताच्या मामाची मुलगी होती. तरुणाचे आपल्या मामेबहिणीवर एकतर्फी प्रेम होते. तो दिल्लीतील संगम विहार भागात राहायचा आणि एका खासगी कंपनीत डिलिव्हरी चे काम करायचा. अब्दुल्ला असे या मयत तरुणाचे नाव आहे. अब्दुल्लाचे आपल्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो तरुणीला स्टेट त्रास देत होता. तरुणीचा अलीकडेच साखरपुडा झाला होता. त्यावेळी या तरुणाने आपल्या हाताची नस कापली होती.

मुलीने सततच्या त्रासाला कंटाळून मुलाला घरी बोलावले आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवले.  घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलाचा जबाब घेतला आणि तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना सांगताना तरुण म्हणाला की मुलीने एकटी असताना मला घरी बोलावले आणि नंतर पेट्रोल टाकून मला पेटवले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मी इकडे-तिकडे  धावत होतो.  त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा शनिवारी मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती